छाबडा शैक्षणिक
संकुल, रायगाव फार्मसी विभागात
“जागतिक पुस्तक
दिन” साजरा
स्व. देविबाई नारायणदास छाबडा ग्रामिण शिक्षण संस्था, सातारा
द्वारे संचालित स्व. एन. बी. छाबडा. इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी (डिग्री) व महालक्ष्मी
इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा), रायगाव यांचे सयुक्त विद्यमाने फार्मसी
ग्रंथालयात जागतिक पुस्तक दिन दि. २२/०४/२०१९ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी
डिग्री फार्मसीचे प्राचार्य झिया खान व डिप्लोमाचे प्राचार्य श्री मधुकर शेंडे
तसेच ग्रंथपाल श्री प्रशांत थोरात उपस्थित होते. २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन United Nations Educational, Scientific and
Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन
(World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक
नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते ग्रंथप्रदर्शन व
उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी पुस्तक दिन लेखक व
पुस्तकांना समर्पित करण्यात आला “वाचत रहा, जगत रहा, शिकत रहा” हा संदेश
याद्वारे देण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यानी आवांतर वाचन करणे व ग्रंथाची गोडी
लागणे यासाठी अभ्यासक्रमीक पुस्तकासोबत इतर पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध करून
देण्यात आलेली होती.
वरील
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. घनशाम छाबडा यांचे मार्गदर्शनाखाली
ग्रंथपाल श्री थोरात सर व सहग्रंथापाल श्री भंडारे सर यांनी केले होते. याप्रसंगी
विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. 





















