Thursday, 30 August 2018

महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी. फार्म) मध्ये सद्भावना दिवस व रक्तदान शिबीर साजरे


दि.२०/०८/२०१८.
महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी. फार्म) मध्ये सद्भावना दिवस व रक्तदान शिबीर साजरे
सौ. देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामिण शिक्षण संस्थेद्वारे संचालीत महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, रायगाव येथे दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी सद्भावना दिवस व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या सर्व घटकामध्ये सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा राहावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सद्भावना दिवस २० ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो तसेच दि. ०५ सप्टेंबर पर्यंत पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा” राबविण्यात येतो.
याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष मा. घनशाम छाबडा यांनी वरील विषयाचे महत्व विषद केले व सर्व उपस्थित प्राचार्य, शिक्षक यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा देण्यात आली. तद्नंतर महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी. फार्म) चे प्राचार्य श्री मधुकर शेंडे यांनी विद्यार्थ्यांना वरील प्रतिज्ञा दिली व या दिवसाचे महत्व पटवून सांगितले.
      तसेच या प्रसंगी महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, रायगाव व बालाजी ब्लड बँक, सातारा यांचे सहकार्याने संस्थेच्या महालक्ष्मी होमीओपॅथीक हॉस्पीटल व रीसर्च सेंटर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये ऐकून ८६ विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी स्वैच्छीक रक्तदान केले. याद्वारे ‘रक्तदान श्रेष्टदान’ हा संदेश विद्यार्थ्यामध्ये रुजवण्यास मदत होते असे संस्थाध्यक्ष श्री छाबडा यांनी सांगितले.वरील कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य शेंडे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. रासकर मॅडम. काळे सर हे होते. तसेच कार्यक्रमाच्या सफल आयोजन श्री छाबडा सरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली व इन्स्टिट्यूट चे  प्राचार्य यांचे नेतृत्वाखाली व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले.

















Saturday, 25 August 2018

‘Library Day’ 126th Birth Anniversary Celebration of S. R. Ranganathan.

Sou. Devibai Narayandas Chhabada Rural Education Society’s Raigaon, Satara‘Library Day’ 126th Birth Anniversary Celebration of S. R. Ranganathan.

on dated 12 Agust 2018